पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील शेतकरी बाळासो कदम यांची शेती निमगाव येथील शेतकरी नवनाथ मगर हे गेले चार वर्षीपासून शेती बटईने करतात या शेतीमध्ये बेडवर ठिबक व मल्चींग पेपर अथंरून केळी व आंतर पीक कलिंगड केले होते केळी व कलिंगडाला सेंद्रिय व रासायनिक सुक्ष्म अन्नद्रव्याचे लाखो रूपये खर्चून नियोजन केले होते .
पण कलिंगड हे दहा ते बारा दिवसात काढणीला येणार होते.
त्यामुळे किटक व बुरशी नाशक फवारणी चालु होत्या 20फ्रेब्रवारी रोजी अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या बॅलरमध्ये ताणनाशक टाकले. त्यामुळे औषध फवारणी झाल्यानंतर दुसर्याच दिवशी 2.५ एकरावरील कलिंगड व केळी सुकुन व उलमुङून पङु लागली
या तज्ञ शेतकऱ्यांनी सांगितले जाणीव पुर्वक या बॅरलमध्ये तणनाशक टाकण्यात आले आहे .
हातातोंङाशी आलेल्या घासाचे नुकसान केले आहे .अशया खुनशी प्रवृत्ती मुळे नाहीसा झाला .
नवनाथ मगर यांचे आजच्या बाजार भावाप्रमाणे कलिंगड प्रति किलो 30 रूपये
2.५ एकरात ६0 टन माल १८ ते 20 लाख व केळीचे १00 टन उपन्न
20 लाख रूपये
असे 3५ ते ४0 लाखाचे नुकसान झाले या बाबत पिलीव माळशिरस पोलीसांनी सदरहुनबागेची पाहणी केली असता शा प्रवृत्तीला पोलासांनी लवकरच शोधुन काढुन कङक कारवाई करावी व नुकसान भरपाई वसुल करावी आशी मागणी नवनाथ मगर यांनी केली आहे.

























