श्रीपुर – माळखंबी तालुका माळशिरस येथे सातत्याने शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी व केबलच्या चोऱ्या होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे . रात्रीच्या सुमारास अंधार व निर्जन परिस्थितीचा फायदा घेत माळखांबी येथिल शेतकऱ्याच्या विहिर, बोअर, सोलार पॅनल वरिल तांब्याच्या धातूच्या केबलच्या चोरीच्या सातत्याने घटना घडत असून शेतकऱ्यांचे पिकां बरोबर आर्थिक नुकसान होत आहे . या बाबत पोलिस स्टेशनला तकारी दाखल असून पोलिसांनी पंचनामेही केले आहेत . परंतू चोरट्यांचा बंदोबस्त होत नाही तो पर्यंत चोऱ्यांचे प्रमाण कमी होणार नाही .
एक तर शेतकरी वर्ग नैसर्गिक आपत्ती वर मात करत रानातील पिके जपत आहे . सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढत असताना सातत्याने विद्युत मोटारी व केबलची चोरी होत असल्याने जीवापाड जपत असलेल्य पिकांचे उघडया डोळ्यांनी होत असलेले नुकसान शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे .
यात शेखर भास्कर गमे हे मोटार रिवायडिंगचा व्यवसाय करतात यांच्या वस्तीवरही तीन वेळा चोरीचा प्रकार झाला यामध्ये शेतीतील तांब्याची केबल, गॅस, शेगडी लायटर, शेतातील शेतमाल मोजायचा इलेट्रिक वजन काटा १२५ किलो ताब्याची तार चोरट्यांनी चोरली त्यामुळे रानातील वस्ती असल्याने शेखर भास्कर गमे आणि त्याचे कुटुबिय रोज रात्र भर जागुन काढत आहेत . पोलिस प्रशासन यावर तपास चालू असल्याचे कारण सांगून वेळ मारून नेत आहे . तसेच तानाजी गमे यांच्या डि पी मधील सुमारे १० हजार रु . चे ऑईल चोरांनी लांबविले आहे .
तर आत्तापर्यंत कमीत कमी १०० शेतकऱ्यांच्या शेतातील ताब्याच्या केबल चोरीला गेल्या आहेत.
या सर्व परिस्थितीत या परिसरातील शेतकरी व नागरिक कमालीचे त्रस्त असून पोलिस प्रशासनासमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे आहे .


















