वैराग : बार्शी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नूतन भव्य बसस्थानकाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. आमदार महोदयांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि महायुती सरकारच्या सहकार्यातून या आधुनिक बसस्थानकाचे ‘आर्किटेक्चरल इन्फ्रास्ट्रक्चरल ३D डिझाईन’ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे.
आधुनिकतेचा नवा चेहरा: कसं असेल नवं बसस्थानक?
हे केवळ एक बसस्थानक नसून बार्शीच्या विकासाचे एक नवे प्रतीक ठरणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या ३D डिझाईननुसार, हे बसस्थानक खालील वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल:
भव्य आणि सुसज्ज इमारत: प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त वेटिंग रूम्स आणि अद्ययावत सोयीसुविधा.
आधुनिक आर्किटेक्चर: शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे जागतिक दर्जाचे डिझाईन.
डिजिटल सुविधा: बसचे वेळापत्रक आणि माहितीसाठी आधुनिक डिस्प्ले सिस्टम.
प्रवाशांची सुरक्षा व सोय: पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे आणि अपंगांसाठी विशेष सुविधा.
“बार्शीमध्ये एक भव्य आणि दिव्य बसस्थानक असावे, हे केवळ बार्शीकरांचेच नाही तर माझेही स्वप्न होते. महायुती सरकारच्या माध्यमातून या कामाला मंजुरी मिळवून घेतली आणि आज याचे डिझाईन समोर येताना मनाला अत्यंत समाधान वाटत आहे. लवकरच वर्क ऑर्डर निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.”
—माजी आमदार राजाभाऊ राऊत
📍 पाठपुराव्याला यश, ‘वर्क ऑर्डर’ लवकरच!
आमदार कार्यकाळात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यापासून ते तांत्रिक मंजुरी मिळवण्यापर्यंतचा प्रवास आव्हानात्मक होता. मात्र, महायुती सरकारने या लोकहिताच्या कामाला प्राधान्य दिले. आता या कामाची ‘वर्क ऑर्डर’ अंतिम टप्प्यात असून, लवकरच बार्शीच्या भूमीत या दिमाखदार इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.
बार्शीकरांच्या संयमाला आता गोड फळ मिळणार असून, हे बसस्थानक जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
बार्शीचा विकास, आमचा ध्यास!

























