Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
March 1, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – वाढती लोकसंख्या, हवामान बदलाचे तीव्र परिणाम आणि घटत चाललेली शेतीयोग्य जमीन या पार्श्वभूमीवर कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. वसंत जुगळे यांनी केले. 

      अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित पीएम उषा अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. जुगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुभाष धरणे, प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले उपस्थित होते.

  ‘ स्पर्धात्मक आधुनिक शेती पद्धती ‘ या विषयावर बोलताना डॉ. जुगळे पुढे म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना सामोरे गेले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत बळीराजाला विविध माध्यमांतून मदतीचा हात देणे अत्यावश्यक आहे.कमी खर्च, कमी पाण्याचा वापर आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करत शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आधुनिक शेती उपयुक्त ठरते. यामुळे अन्नसुरक्षा बळकट होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते.स्मार्ट सिंचन तंत्रज्ञानाद्वारे ठिबक आणि तुषार सिंचनाचा अवलंब केल्यास सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत शक्य आहे. ड्रोन व रोबोटिक्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कीटकनाशकांची अचूक फवारणी व पिकांचे आरोग्य परीक्षण करता येते. तसेच कमी रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर करून सुधारित, रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. पारंपरिक पिकांऐवजी फलोत्पादन, औषधी वनस्पती लागवड आणि पॉली हाऊस शेतीकडे वळल्यास उत्पादन वाढीस चालना मिळू शकते. यामुळे मानवी श्रम व उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते. सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि शाश्वत विकासाचा मार्ग सुकर होतो, असेही त्यांनी नमूद केले.

          अध्यक्षीय भाषणात चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिषदेत उत्साहात सहभागी होऊन यामधील व्याख्यानाचा श्रवण करुन अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. धबाले यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.दुपारच्या सत्रात गव्हर्नमेंट महाविद्यालय कलबुर्गी येथील डॉ. टी. आर. गुरुबसप्पा यांनी ‘बाजार संबंध, किमान आधारभूत किंमत आणि कृषी विपणन सुधारणा’ या विषयावर, डॉ. राजेंद्र पाटील यांनी ‘सेंद्रीय शेती व आधुनिक सिंचन व्यवस्था’ या विषयावर, डॉ. विजय व्हनकडे ( पुणे) यांनी ‘ डिजिटल शेती व स्पर्धात्मक आधुनिक शेती ‘ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.या परिषदेस सोलापूरचे डॉ. राजाराम पाटील, डॉ. सुनील मगर, डॉ. अविनाश जम्मा, डॉ. महादेव कांबळे, डॉ. रेवप्पा कोळी, डॉ. शंकर राजे, प्रा. युवराज सोलापूरे, डॉ. राहुल भोसले डॉ. राहुल मोपारे ( कोल्हापूर) यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर थोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संध्या इंगळे यांनी केले.

कोल्हापूर च्या फडके प्रकाशन तर्फे अर्थशास्त्र विषयावरील पुस्तक व संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाला सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी भेट देऊन पुस्तक व संदर्भ ग्रंथांची खरेदी केली.

विद्यार्थ्यांना भविष्यात शेती, शेतीपूरक व्यवसायात सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी दशेतच अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शेती आणि पूरक व्यवसायातून भविष्य घडवावे.

– बसलिंगप्पा खेडगी 

चेअरमन 

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी.

Post Views: 94
Previous Post

ओंकार कारखान्याचा गाळप हंगाम सांगता समारंभ

Next Post

तातडीने बससेवा सुरू करण्यासाठी थेट परिवहन मंत्र्यांकडे मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

तातडीने बससेवा सुरू करण्यासाठी थेट परिवहन मंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1000789

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!