Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोशल महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळा

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोशल महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोशल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. वडजे यांनी आपत्ती ओळखून त्यावर योग्य व तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी जपत नेतृत्व स्वीकारणे आणि समस्यांचे परिणामकारक निराकरण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतासारख्या युवा देशात युवकांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारून समाज व देशावर येणाऱ्या आपत्तींचा समर्थपणे सामना करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. दंडे म्हणाले की, एकदा नेतृत्व स्वीकारले की ते कणखर असले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत नेतृत्वापासून मागे हटता कामा नये. व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जे. के. मुल्ला तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक नारायणकर उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक नारायणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रहीसा मिर्झा यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. वंदना भानप यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन प्रा. तबस्सुम मोमीन यांनी केले.

कार्यशाळेस विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे दीडशे स्वयंसेवक तसेच जवळपास वीस कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी ‘कुशल नेतृत्व व सातत्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी प्रतिबंध व बॉम्बशोधक पथकाविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पोलीस मुख्यालयातून श्री. अविनाश पाटील, श्री. प्रवीण भोपळे, नासिर बागवान, अनंत कोकरे, सचिन आंबलगी तसेच श्री. रामपुरे उपस्थित होते. त्यांनी सायबर गुन्हेगारी व बॉम्बशोधक पथकाच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती देत प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी डॉ. श्रीनिवास जगताप, डॉ. अण्णासाहेब साखरे, डॉ. युवराज सुरवसे, डॉ. पाटणकर मॅडम, डॉ. सिदम मॅडम तसेच डॉ. अमोल शिंदे उपस्थित होते.

तीन दिवस चालणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सामाजिक जाणीव व आपत्ती व्यवस्थापनाबाबतची तयारी विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Post Views: 45
Previous Post

बदफैली मुख्यध्यापक एम. डी. बिराजदार व शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघांना सेवेतून बडतर्फ करा – संभाजी आरमार

Next Post

कंदर–सातोली शिवरस्ता तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आत्मदहनाचा इशारा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कंदर–सातोली शिवरस्ता तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895546

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697