बार्शी – महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय सैनिक स्कूलसाठी निवड झालेली आहे. यामध्ये वेदांत बाबासाहेब अंधारे याने ३०० पैकी २७६ गुण मिळवले तर स्वराज विशाल नवले ३०० पैकी २४५ गुण मिळवले आहेत.
महाराष्ट्र विद्यालयातील या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी. पाटील,सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य अरुण देबडवार, खजिनदार जे. सी. शितोळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी.साठे, पर्यवेक्षक मदने के.जी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
























