पंढरपूर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव व सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचातीच्या वतीने मंगळवारी (दि.१० मार्च) विविध विधायक उपक्रमाचे,खेळ मनोरंजनाचे तसेच प्रबोधात्मक आरोग्य विषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनानिमित्त मंगळवारी नारायण चिंचोली येथे महिला सक्षमीकरण या विषयावर यशदा संस्थेच्या विशेष ट्रेनर ज्योतीताई पाटील यांच्या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा भानुसे यांच्या वैद्यकीय टीमने उपस्थित महिलांची कर्करोग तपासणी, बीपी शुगर ऍनिमिया हिमोग्लोबिन दंतरोग तपासणीचे शिबिर आयोजित केले होते.यामध्ये अनेक महिलांचे समुपदेशन करून योग्य औषधोपचार करण्यात आला.तसेच यावेळी गावातील सदृढ बालक माता,
जेष्ठ महिला,आदर्श मतांचा सत्कार तसेच लेक लाडकी योजनेतील लाभार्थी महिलांचा, व ग्राम प्रशासन चालवणाऱ्या सर्वच शासकीय महिला अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान तालुका वैद्यकीय अधीकारी डॉक्टर एकनाथ बोधले, सरपंच नर्मदा धनवडे व उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांच्या हस्ते करणेत आला. विठाई महिला ग्रामसंघ या महिला बचत गट कार्यालयाचे उदघाटन करून शोभा आहेर यांच्याकडे ताबा देण्यात आला आले.
महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजन करण्यात आले. सादरकर्ते शहाजी देशमुख यांचे बहारदार सादरीकरण, गुंडीबा कांबळे यांचे नियोजन आणि महिलांचा उत्साह यामुळे नारायण चिंचोली येथे माता – भगिनींचा उत्साह ओसंडून वहात असल्याचे दिसून आले.
यात विजेत्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक म्हणून पैठणी केतकी धनवडे यांचेकडून, द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ शाही गोल्ड दामोदर मार्केट पंढरपूरचे उद्धव बाबर यांच्यावतीने, तर तृतीय पारितोषिक मिक्सर गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय कोळेकर यांच्याकडून देण्यात आले. याशिवाय उपस्थित सर्वच महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने पोळी डबा सप्रेम भेट देण्यात आला. तर राजे ग्रुप ४९९ चे अध्यक्ष विठ्ठल माने यांनी उपस्थित सर्वच महिलांसाठी अल्पोपहाराची सोय केली. हे सर्व कार्यक्रम कर्मयोगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्यचे संचालक लक्ष्मण धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सरपंच नर्मदा धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कोल्हे, अमृता गायकवाड, अलका माने, शोभा आहेर, डॉ.स्वप्नाली शिंदे, वर्षाराणी नलवडे, विष्णू माने, ज्ञानेश्वर बरडे, सुनील माने, बळवंत धनवडे, विजय कोळेकर, पोपट पाटील,दत्तात्रय बनसोडे, मुकुंद घाडगे, पिनू माने,बापू कोले, संदीप हिंगमिरे, शिवाजी वसेकर, महेश माने, ज्ञानेश्वर वाघमोडे,महादेव डुबल यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका व गावातील शेकडो महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड यांनी केले. तर ग्रामपंचायत सदस्या शुभांगी कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
























