आटपाडी – तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी करगणीचे दतात्रय पाटील यांची तर उपसभापती पदी दिघंचीच्या कल्पना पुसावळे यांची बिनविरोध निवड झाली . या दोघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक निकाल लागल्यानंतर आटपाडी पंचायत समितीच्या एकूण आठ गणापैकी चार गणांमध्ये महिलाराज आहे . तर एका ठिकाणी तृतीय पंथी व्यक्तीनेही आपली जनमाणसांतील उपलब्धी दाखवून दिली होती. त्या तृतीयपंथीय सदस्याला आपल्या मतदार संघात कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटविण्या आधीच जीवनातून अचानक एक्झिट घ्यावी लागली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वास, अडचणी मध्ये मदतीचा हात पुढे करणारा व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला . त्यामुळे एक जागा रिक्त झाली.
इतर तीन ठिकाणी पंचायत समिती सदस्य पुरूष आहेत. शिवसेना शिंदे गटाने ५ ठिकाणी विजय मिळवून सत्ता मिळविली होती . तर ३ सदस्य भाजपचे पंचायत समितीवर निवडून आले होते . तर जिल्हा परिषदेच्या आटपाडी तालुक्यातील ४ जागापैकी २ जागी शिवसेनेने आपले उमेदवार निवडून आणले तर एक जागा भाजपाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिंकली होती . या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या दोन्ही पदावर आरूढ होत शिवसेनेने आपली सत्ता प्रथमतः आटपाडी तालुका पंचायत समितीवर प्रस्थापित केली आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























