माळशिरस – अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शिखर शंभू महादेवाची यात्रा २३ मार्च पासून सुरु होत असून या यात्रे मधील मुख्य आकर्षण असलेल्या मुंगी घाटातील कावडी सोहळा सोमवार ३० मार्च रोजी संपन्न होत असून या यात्रे साठी माळशिरस शहर व परिसरातील कावडी सज्ज झाल्या आहेत.
शिखर शिंगणापूरच्या यात्रे साठी माळशिरस शहरातून नारायण थोरात, महादेव थोरात,गंगाधर सुतार,तानाजी सुतार,नामदेव कुंभार,विजय बोकफोडे .सुभाष कोळी ,गोविंद कोळी ,रखमाजी जंगले,महादेव शिंदे,शिवाजी शिंदे,प्रकाश पिसे,सोनवणे,बोराटे यांच्या कावडी यात्रे साठी जाण्याची शकडो वर्षांची परंपरा आज हि सुरु आहे.
पाडव्या दिवशी या शंभू महादेवाच्या कावडीला वस्त्र नेसवली जातात त्यानंतर ग्राम दैवतास धार घालून या कावडी उत्सवाची सुरवात होते .त्यानंतर शहरातील अनेक भक्त आपल्या घरी कावडीना बोलवून त्याची पूजा करून कावड्याना चहा , अल्पोपहार,जेवण देतात. एकादशी दिवशी या पैकी काही कावडी कोथळ्याला मुक्कामाला जातात व दुस-या दिवशी द्ववदशीला मुंगी घाटातून शिंगणापूर येथे प्रवेश करून महादेवास धार घालतात व तेरशीला महादेवाला धार घालून परतीला निघतात तर काही कावडी माळशिरस वरून वाहनातून शिंगणापूरला जातात तर या पैकी काही कावडीना नातेपुते येथील पर्वतेशेवर मंदिरातील शंकर पार्वती विवाह सोहळ्यास वऱ्हाडा चा मान आहे तर माळशिरस येथील पोलीस पाटील यांना या विवाह सोहळ्यात वर होण्याचा मान आहे तर नातेपुते येथील पोलीस पाटलांना वधूचा मान आहे. त्यानंतर कवडींची माळशिरस शहरामध्ये ठिकठिकाणी पूजा केली जाते व हनुमान जयंती दिवशी मोठ्या भक्ती भावात फटाक्याच्या आतिश बाजीत मिरवणुकीने या कावडी उत्सवाची सांगता होती


























