बार्शी – राजर्षी शाहू लॉ कॉलेज व जिजाऊ सावित्री रमाई महिला बळविकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मोठ्या उत्सवात पार पडला. कार्यक्रमासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या सर्व शाखेमधील २२५ महिलांनी सहभाग नोंदवला.
छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, छत्रपती शाहू महाराज, जिजाऊ, सावित्री व रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कु. सौम्या सोपल यांनी स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय डॉ. स्मिता सुरवसे डॉ. लाजवंती राठोड यांनी केले. प्रास्ताविक डॉ.ज्योती माळी यांनी केले. मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, प्रमुख पाहुणे म्हणून जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, मा.प्राचार्य चंद्रकांत मोरे, सर्व शाखेतील प्राचार्य, राजर्षी शाहू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. रत्नदीप सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
समितीच्यावतीने देण्यात येणारा शौर्य पुरस्कार कुमारी.संगीता चौधरी यांना देण्यात आला, उत्कृष्ट शाखांना समितीच्यावतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध शाखेमधील गरजवंत व गुणवंत विद्यार्थी यांना रोख स्वरुपात रक्कम देऊन सहकार्य केले. भाऊबीज निधी वाटप केला, लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या फोटोंचे वाटप संस्थेतील सर्व शाखांना महिला बळविकास समिती यांच्यामार्फत करण्यात आले व सर्व समंतीने नवीन समिती पदाधिकारी निवड करण्यात आली.
अध्यक्ष- डॉ. स्मिता सुरवसे, उपाध्यक्ष- प्रा.मंजुषा श्रीमंगल, कार्याध्यक्ष- प्रा. संगीता गायकवाड, सचिव- ग्रंथपाल ज्योती यादव, सहसचिव- डॉ. ज्योती माळी, खजिनदार- डॉ. लाजवंती राठोड. निवड प्रक्रिया जिजाऊ सावित्री रमाई बळविकास समितीची निवड सर्व मान्यवर व महिला सदस्य यांच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्य््दीपिका साखरे व कार्यक्रमाचे आभार प्रा. शिकारे मॅडम यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के, प्रा. मिठ्ठा, प्रा. सुरवसे, प्रा. कुलकर्णी, प्रा. हरदाडे, प्रा. काळे, प्रा. खोत, प्रा. शेख, प्रा. वडणे, प्रा. तायडे, गव्हाणे, वाघे, माने, ठोंबरे, शेळके, कोल्हे व सातपुते यांनी परिश्रम घेतले.
























