सोलापूर – कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने बांधून ठेवलेल्या ६ गाईंची मंद्रूप पोलीसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख ४० रूपये किमतीच्या गायींची सुटका करण्यात आली आहे.
म
ंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीनुसार कुरघोट येथे मोहम्मद अली कुरेशी याचे शेतातील गोठ्यात कत्तलीसाठी गायी बांधून ठेवल्याचे सांगितले . पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे पीएसआय कदम, बापू शिंदे, संदीप काळे, ज्ञानेश्वर भोसले व शिवणे मेजर, सागर चव्हाण, यांचे पथक तयार करून सदर पथकाने छापा टाकला असता,आरोपींनी त्यांच्या शेतामध्ये गोठ्यात सहा गाई कत्तलीसाठी आणल्याचे दिसून आले. या पथकाने तात्काळ कारवाई करून गायींची सुटका केली व त्यांना देखभाल व सुरक्षिततेसाठी अहिंसा गोशाळा येथे वैद्यकीय तपासणी करून जमा केले.
बादशहा इमान सुतार (वय ५५, रा. कुरघोट, ता. द. सोलापूर)
मोहम्मद अली कुरेशी (वय १९, रा. लष्कर, सोलापूर) या आरोपिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..
…
“प्राण्यांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही”
…
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे यांच्या पथकाने कारवाई केली.























