सोलापूर : अवंती नगर ते गणेशनगरपर्यंतच्या नाला रुंदीकरण व खोलीकरण कामात कोणतीही ढिलाई नको, असे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिले.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी अवंतीनगर, गणेशनगर परिसरास भेट देऊन तिथे सुरू असलेल्या नाल्याच्या कामाची पाहणी केली. अवंती नगर ते गणेशनगर या दरम्यान नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरु असून या कामाची आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला.यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कामात कोणतीही ढिलाई न ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच नाल्याची क्षमता वाढवून पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने काम प्रभावीपणे राबविण्याचेही त्यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, श्याम कन्ना आदी उपस्थित होते.
























