श्रीपूर – येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीज व रोटरी क्लब ऑफ अकलूज तर तसेच देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मधुमेह तपासणी शिबिरात २०९ रुग्णांची तपासणी करण्यात आली . यामध्ये ४o जणांना मोतीबिंदू आढळून आला .
शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर , वैद्यकिय अधिकारी डॉ . सुधीर पोफळे ,रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके , सचिव अजिंक्य जाधव , संचालक कल्पेश पांढरे , प्रकल्प संचालक संदीप लोणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले .
यावेळी जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर यांनी आज वैद्यकिय सेवा महाग होत असताना रोटरी क्लबच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तसेच नेत्र तपासणी शिबिर या बरोबरच वृक्षारोपण , शेतकरी मार्गदर्शन हे समाजीक उपक्रमाचा सर्व सामान्यांना मोफत लाभ मिळत असल्याने रोटरीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे विशद केले . तर
रोटरीचे अध्यक्ष केतन बोरावके यांनी मोती बिंदूचे निदान झालेल्यांची दि. २५ मार्च रोजी मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले . या प्रसंगी ब्रिमा सागरचे डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत, नरेश पाठक, सतीश डिंगरे, भागवत पारसे, अरविंद इंगळे, सत्यजित पाटील, हेमंत पाटील, नानासाहेब केचे, राष्ट्रीय साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन बेनकर , सेक्रेटरी राजेंद्र होनमाने , सागर कोळी, सलील तांबोळी, सुरज शिंदे, ऋषिकेश सलगर उपस्थित होते.
शिबीरास डायग्नोस्टिक सेंटरचे वैभव कांबळे , निसार शेख यांचे सहकार्य लाभले . प्रास्ताविकात केतन बोरावके यांनी रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रसाद अक्कलकोटकर यांनी केले तर आभार हेमंत पाटील यांनी मानले.
























