धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर येथे व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या वतीने दि. “विद्यापीठ – उद्योग समिट २०२६” चे आयोजन करण्यात आले.
प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षीही इंडस्ट्री मधील विविध थीम वरती याचे आयोजन केले जाते. या वर्षी “इन्शुरन्स” या थीम वरती समिट घेण्यात आली. उद्घाटनाला तेरणा महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. डी. बी. मोरे होते. मार्गदर्शन करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पाच ट्रिलियन इकॉनॉमीचा प्रवास बाबत मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उप परिसर संचालक डॉ . रमेश चौगुले होते. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, समन्वयक डॉ. विक्रम शिंदे, डॉ . सचिन बस्सैये उपस्थित होते. पुढील सत्रात एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्स चे श्री. प्रसाद कस्तुरे, एल. आय . सी. चे श्री ए. के. सय्यद आणि टाटा ए. आय. जी. चे श्री. पीयूष वेदलंकार यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात प्रश्न आणि उत्तरे घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सदर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षक प्रा. शीतलनाथ एखंडे, प्रा. शरद सावंत, प्रा. भाग्यश्री कुलकर्णी, प्रा. पुजा होणाळकर, विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सदर विद्यापीठ – उद्योग समिट हा विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता प्रा. डॉ. विना हुंबे, संचालक प्रा. डॉ. अभिजित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.























