सोलापुर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी किल्ले रायगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला होता व संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते.
या आदेशाचे पालन करत मनसे नेते दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सोलापूर शहर ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी सभासद नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके व शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी आदी उपस्थित होते.























