सोलापुर – युवा पॅंथर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. डॉ. वाघमारे यांच्या निवडीमुळे आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एका अभ्यासू नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संस्थेच्या वतीने डॉ. वाघमारे यांना सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. वाघमारे यांनी तळागाळातील प्रश्नांवर प्रबोधनाच्या आणि भाषणाच्या माध्यमातुन भरीव काम केले असून, आता संसदेच्या माध्यमातून त्या राज्याच्या प्रश्नांना वाचा फोडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे मनोगत सत्काराला उत्तर देताना डॉ. वाघमारे म्हणाल्या की, “युवा पॅंथर सारख्या सामाजिक संघटना जेव्हा कार्याची दखल घेतात, तेव्हा जबाबदारी अधिक वाढते. सर्वसामान्यांचे प्रश्न, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर माझा संसदेत विशेष भर असेल. हा सत्कार माझ्या एकटीचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.” यापुढे सोबत मिळुन काम करुयात.
यावेळी युवा पॅंथर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आतिश बनसोडे, भिमशक्ती सेना तरुण मंडळाचे अध्यक्ष गौरव कांबळे, रोहन आखाडे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.























