सांगोला – कस्टडी रूमचे कुलूप तोडून इयत्ता १० वीच्या भूगोल विषयाचे ५० प्रश्नपत्रिका चोरीचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार दि.१७ मार्च रोजी सांगोला विद्यामंदीर प्रशालेतील कस्टडी रुममध्ये ठेवलेले इ.१० वी बोर्ड परिक्षेचे भूगोल विषयाचे पेपर कोणी तरी अज्ञात इसमाने चोरुन नेलेबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी सांगोला पोलिसांनी वेगवेगळी शोध पथके तयार करुन रवाना केली होती. यातील पथकाने गोपनीय माहितीच्या व तांत्रिक पुराव्याच्या आधारे अज्ञात आरोपीची गोपनीय माहिती काढली असता, सदरचा गुन्हा एका अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकाने केल्याचे उघड झाले आहे. या अल्पवयीन बालकाकडे त्यांच्या पालकाचे समोर पोलिसांनी सविस्तर चौकशी केली असता त्याने गुन्हा केलेबाबत कबुली दिलेली आहे. तसेच त्याने गुन्हा करते वेळी वापरलेले इलेक्ट्रीक कटर, इलेक्ट्रीक मोटार सायकल, चोरीस गेलेले इयत्ता १० वी बोर्ड परिक्षेच्या भूगोल विषयाच्या प्रश्न पत्रिका व तीन कोऱ्या उत्तर पत्रिका जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी कोल्हापुर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मंगळवेढा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे संजय जगताप, सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सपोनि.वाघे, सपोनि.मोरे, पोसई.पुजारी, पोसई.पाटील, मपोसई.चव्हाण, पोहेकॉ. वाघमोडे, पोहेकॉ.अस्लम काझी, पोहेकॉ.वजाळे, पोहेकॉ. राजगे, पोहेकॉ.सावंत, पोहेकॉ.प्रमोद गवळी, पोहेकॉ.संतोष देवकर, पोहेकॉ.क्षीरसागर, पोहेकॉ.जाधव, पोना.लेंगरे, पोकॉ.पाटील, पोकॉ.मारुती पांढरे, पोकॉ.माळी, पोकॉ. कुंभार, पोकॉ.राजु आवटे, पोकॉ.अमोल वाडकर, पोकॉ. रमेश सुर्यवंशी, पोना.इरकर, पोकॉ.वाघमोडे यांनी केली. पुढील अधिक तपास.सपोनि मोरे करीत आहेत.






















