सोलापूर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सोलापूर शहर शाखेने आपल्या विलक्षण कार्यकर्त्या मधुरा सलवारू ताईंचा सत्कार करून त्यांच्या समर्पणाला मान्यता दिली. ८० वर्षांच्या वयातही ताईंच्या जिद्दीने तयार केलेले १०५ वैज्ञानिक प्रयोगांचे किट हे राज्यभरातील शाखांसाठी ऐतिहासिक उपक्रम ठरले. स्वखर्चाने महिनाभर परिश्रम घेऊन हे किट तयार करून वाटप केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
वैज्ञानिक किटचा प्रवास: ताईंनी वेगवेगळ्या ठिकाणाहून साहित्य मागवून प्रत्येक किट काळजीपूर्वक तयार केले. उषा शहा, अंजली नानल, निशा भोसले, सुनिता गायकवाड, शिला हावळे यांचे सहकार्य लाभले. भारत विठ्ठलदास, अनिल वेल्हाळ, गणेश चिंचोले, रामभाऊ नलावडे, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, मिलिंद देशमुख यांनी साहित्य कार्यक्रमस्थळी पोहोचवले.
राज्यातील अनेक शाखांना ही किट मिळाली आणि सदस्यांनी ताईंचे मनापासून कौतुक केले.३० वर्षांची निष्ठा: गेल्या ३० वर्षांपासून चळवळीत सक्रिय असलेल्या ताईंनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत कार्य केले. २०२५-२६ मध्ये स्वखर्चाने सर्प विज्ञानाचे १० प्रयोग, फटाके मुक्त दिवाळीचे १० प्रयोग, डॉ. दाभोलकर आदरांजलीचे १० कार्यक्रम आणि १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ अंतर्गत ‘मुलं-मुली वयात येताना’ व्याख्यान असे १०० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले.सत्कार सोहळा: डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या सत्कारप्रसंगी शहर शाखेचे कार्याध्यक्ष आर. डी. गायकवाड, सचिव सुजित हावळे, उपाध्यक्ष अण्णा दीक्षित, सदस्य दीपक पांडागळे, डॉ. निलेश गुरव, शिला हावळे, अंजली नानल उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुजित हावळे, आभार शिला हावळे यांनी मांडले. डॉक्टर हमीद व मुक्ता दाभोळकर यांनीही ताईंचे कौतुक केले.सोलापूर शहर शाखा ताईंच्या जिद्दीला सलाम करते! त्यांचे कार्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे.


























