सोलापूर – हिंदू संस्कृतीत विविध सण उत्सवाला मोठे महत्त्व आहे, चैत्र महिन्यातील पहिला दिवस साडेतीन मुहूर्तपैकी एक असून या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून सहकुटुंब पूजा करण्यात येते..
एकत्व फाउंडेशन च्या मार्फत पुण्याला जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेल्या कडुलिंबाचे वृक्ष लावले होते,
दरम्यान बुधवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस वादळ वाऱ्यामध्ये वाकलेल्या आठ फूट उंचीच्या कडुलिंबाच्या वृक्षाला बांबूच्या सहाय्याने उभे करून पाणी देऊन पूजा केली, पर्यावरण जतन करण्याचा प्रयत्न एकत्व सोशल फाउंडेशन बाळे सदस्याने केले. गेल्या काही काळापासून प्रत्येक सण,उत्सव आणि पर्यावरण बद्दल संवेदनशीता निर्माण करण्याचे अभियान राबवण्यात आले आहे.
गुढीपाडवा हा सण ऊर्जशी जोडलेला एक सण आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये या सणास अनन्य साधारण महत्व आहे.या शुभ दिवशी नवीन वस्तू, इलेक्ट्रिक, दोचाकी, चारचाकी, वाहने खरेदी सोने खरेदी व्यवसाय प्रारंभ नवीन उपक्रमाचा प्रारंभ इत्यादी गोष्टी आवर्जून केल्या जातात, कारण वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण विशेष करून एक तरी कडूलिंबाचे वृक्ष लावूया आणि आजूबाजूच्या नागरिकांना मोफत ऑक्सिजन घ्या, झाडाची गुढी उभा करा व गुढी पाडवा कडुलिंब वाढवा संदेश देण्यात आले…
याप्रसंगी : शुभम जाधव, केदार पाटील, राजेश वाघमोडे, ऋषिकेश हरसुरे, चेतन झाडे, दीपक करकी शहाबाज मकानदार, किरण सरवळे, राजेश केकडे, यावेळी उपस्थिती होते.
वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम, राबवले जातात, यामध्ये वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या रोपाचे वाटप व वृक्षारोपण करण्यात येते, रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांना झाडांना राख्या बांधणे, दसऱ्याला आपटा, मोफत देणे,महाशिवरात्री दिवशी बेल वृक्ष लावून लागवड व त्याचे संगोपन करण्यात येते..
दीपक करकी, प्रमुख एकत्व सोशल फाउंडेशन बाळे..

























