सोलापूर – नई जिंदगी व परिसरातील लोकांना रमजान ईदची खरेदी करण्यासाठी सोईचे व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून नई जिंदगी चौक येथे अमिना बजार भरवला जातो. यावर्षी अमिना बजार भरवले असून बुधवार दी. 18 मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद करणाचे यांच्या हस्ते व माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार अमिना बजार कमिटीच्या वतीने करण्यात आला. यावेळी खलील हिरोली, इलियास डंके, इंलियास कंपली, सद्दाम सय्यद साथी, अमिना बजार कमिटी अध्यक्ष हिदायत पठाण, कार्याध्यक्ष शाहिद फुफ्फा, उपाध्यक्ष नवाज मुल्ला, वसीम अन्सारी व कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


























