धाराशिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिषद व्यवस्थापनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक वरुणराज चंद्रशेखर कळसे यांना “बीजनेस ॲडमिनिस्ट्रेशन” विषयातील पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्याचा “अ स्टडी ऑफ सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट इन ऑनलाइन शॉपिंग विथ रेफरन्स टू मराठवाडा रिजन” विषय होता. संशोधनासाठी डॉ. मोहम्मद फारुख खान यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संचालक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. विक्रम शिंदे, डॉ. जितेंद्र शिंदे, डॉ. सचिन बसैये, तसेच त्यांच्या कुटूंबातील चंद्रशेखर कळसे, माणिक कळसे, वैष्णवी कळसे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


























