हाणेगाव : सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या एस आय आर म्हणजेच मतदान कार्डचे नवीन नाव समावेश प्रक्रिया 2002 मध्ये लग्न झालेल्या महिलांनी आपल्या मतदारसंघातील बी एल ओ ला भेटून आपल्या वडीलाचे मतदान कार्ड व नाव समाविष्ट असलेले कार्डचे नंबर देऊन प्रक्रिया पूर्ण केली जात आहे तरी हाणेगाव येथील आठ मतदान केंद्रामध्ये सर्व बी एलओ चे काम जवळपास 80 ते 90 टक्के पूर्ण झाले असून पुढील कामासाठी सर्व कार्य करत असल्याचे दिसून येत आहे.
हाणेगाव विभागात 14 गावे असून यामध्ये हाणेगाव खुतमापूर, कोकलगाव, बिजलवाडी, कुणमारपल्ली, कामाजीवाडी, कुडली ,वझर ,कबीरवाडी, शिळवणी, महेबूबनगर तुंबरपळी, या गावातील सर्व बी एल ओ ची कामे प्रगतीपथावर असल्याचे टी आर बिरादार यांनी सांगितले या बी एल ओ चे सुपरवायझर हाणेगाव विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मण बेंजलवार, व तसेच चैनपुरे व्ही व्ही काम पाहत आहेत तर हाणेगाव येथील संपूर्ण बी एल ओ चिट्टी व मधील असलेले कर्मचारी टी आर बिरादार, सोनवणे एस बी, कुंभार वि जी ,पवार बी पी, मदने एस पी, भंडारे एस ,आर ,राठोड ए जी, चलवे एस व्ही ,या सर्व बी एल ओ चे कार्य प्रगतीपथावर असल्याचे बिरादार टी आर यांनी सांगितले





















