सोलापूर – विकृत भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. सोलापूर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा चौक येथे करण्यात आले. यावेळी अशोक खरात यांच्या पोस्टरला शेणाच्या गोवऱ्या खाऊ घालत मनसेने तीव्र निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी मनसेचे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, मविसेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, प्रकाश कोळी, विश्वास गजभार, गोविंद बंदपट्टे, सोपान महिंद्रकर, वैभव रंपुरे, रविंद्र कांबळे, विठ्ठल बंडा, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, श्रीराज महिंद्रकर, विनायक माढेकर आदी उपस्थित होते.
























