Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई होणार

तरुण भारतbyतरुण भारत
March 26, 2026
in editor
0
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई होणार
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यातील गॅस एजन्सी समोर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने २३ मार्च रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरी काही ठिकाणी गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी लाईन व गर्दी होत असल्याचे दिसून आलेले आहे. तरी गॅस कंपन्यांनी गॅस एजन्सी समोर गर्दी होणार नाही, तेथून गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार नाही त्याप्रमाणेच अवैध गॅस सिलेंडर विक्री होऊ नये, याबाबत सूचना द्याव्यात. अन्यथा प्रशासनाकडून अशा गॅस एजन्सीवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. रघुकुमार, बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव, एचपीसीएलचे सागर चव्हाण व आयओसीएलचे सागर गौतम उपस्थित होते.  
     जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, गॅस कंपन्यांनी गर्दी होत असलेल्या एजन्सींची यादी प्रशासनाला द्यावी. तसेच संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी तेथे येणाऱ्या नागरिकांना गॅस सिलेंडर पुरवठ्याच्या अनुषंगाने अत्यंत सौजन्याने माहिती सांगावी. त्याप्रमाणेच ग्रामीण भागातील एजन्सी समोर गर्दी होत आहे का या अनुषंगाने संबंधित सर्व तहसीलदार यांच्याकडून आवाहल मागविण्यात येत आहे. दोन्ही अहवालाची पडताळणी करून आवश्यक त्या गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    सर्व गॅस कंपन्यांनी त्यांना वरिष्ठ स्तरावरून सोलापूर जिल्ह्यासाठी दैनंदिन किती प्रमाणात गॅस पुरवठा केला जात आहे तसेच त्याचे वितरण कशा पद्धतीने होत आहे याची माहिती दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पुरवठा विभागाला सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. प्रशासन व सर्व गॅस कंपन्या यांच्यामध्ये समन्वय व संवाद असला पाहिजे. त्यामुळे नागरिकांना विहित पद्धतीने व वेळेत गॅस पुरवठा उपलब्ध करण्यात अडचण निर्माण होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

*आवाहन –
      गॅस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गॅस पुरवठा वितरण यामध्ये सुधारणा होत आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर सरासरी साडेचार दिवसात घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा केला जात आहे. तथापि ज्या ठिकाणी बुकिंग झाल्यानंतरही गॅस सिलेंडर मिळण्यास जास्त कालावधी लागत आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त गॅस पुरवठा करण्याचे निर्देश गॅस कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात गॅस उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गॅस सिलेंडर साठी गॅस एजन्सी समोर गर्दी करू नये. गॅस एजन्सी येथून गॅस सिलेंडर मिळणार नाहीत. ऑनलाइन बुकिंग झाल्यानंतर विहित वेळेत आपल्याला घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा होणार आहे, नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
   प्रारंभी तिन्ही गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना उपलब्ध होत असलेल्या एलपीजी गॅस बाबतची माहिती बैठकीत दिली. तसेच काही ठिकाणी नागरिकांना सूचना देऊनही गॅस सिलेंडर साठी तसेच माहितीसाठी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पीएम उज्वला गॅस योजनेतून 45 दिवसात गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे, अशी माहिती दिली.

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा तुटवडा नाही –
     राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांकडून पेट्रोल व डिझेलच्या घाईघाईने खरेदीमुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असल्याचे राज्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मात्र, राज्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात ही पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व घाईघाईने खरेदी करण्याची गरज नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Post Views: 42
Previous Post

सोलापूरहून अयोध्येला थेट जाण्यासाठी पंढरपूर किंवा सोलापूर येथून रेल्वे सुरू करण्याची मागणी

Next Post

बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958048

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!