Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डिजिटल अरेस्ट गुन्हयातील एकास अटक

तरुण भारतbyतरुण भारत
March 26, 2026
in crime
0
डिजिटल अरेस्ट गुन्हयातील एकास अटक
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहर सायबर पोलीस स्टेशनकडुन डिजिटल अरेस्ट मधील गुन्हयात सहभागी असणाऱ्या एका गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे.

सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथील तक्रारदार यांना दि.28/07/2025 रोजी सांयकाळी 04.00 वा.चे सुमा घरी असताना फसवणुकदाराने अनोळखी मोबाईलवरुन तक्रारदार यांना संपर्क साधुन मी टेलीकॉम डिपार्टमेंट मधून टेलिकॉम ऑफिसर बोलत आहे असे सांगुन, तुमचा मोबाईल क्रमांकाचा मिसयुज झालेला असुन, तुमच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशन मुबई येथे गुन्हा दाखल झाला आहे व सदर गुन्हयाचा तपास कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथील पोलीस सब इन्स्पेक्टर विजय खन्ना हे करीत आहेत असे सांगुन, पुन्हा तक्रारदार यांना अनोळखी मो. क्र. +917207888598 यावरून चॉटसअप कॉल करुन मी विजय खन्ना सब इन्स्पेक्टर कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथुन बोलत आहे असे सांगुन, तक्रारदार यांचे कौटुंबिक माहिती घेवून कुलाबा पोलीस स्टेशन येथे एक मनी लाँडरींगचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सीबीआय ऑफिसर प्रविण सुद हे करीत आहेत असे सांगितले व फोन ठेवला. पुन्हा दुसऱ्या अनोळखी वॉटसअॅप क्र. +919146979289 यावरून कॉल करुन, एक डुप्लीकेट आधारकार्डची फोटो कॉपी व तक्रारदार यांचे नावे असलेले कॅनरा बँकेचे एटीएम कार्डची फोटो कॉपी पाठवून, तुमचे हे आधारकार्ड व एटीएमकार्ड कुलाबा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मनी लौंडरींग गुन्हयातील आरोपी नामे नरेश गोयल याचे घरामध्ये सापडले आहे. नरेश गोयल यास अटक केली असून तपासामध्ये आपल्या नाव असलेल्या कॅनरा बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक उलाढाल झाली असून या प्रकरणामध्ये आपला ही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असे सांगितले व तक्रारदार यांचे नावाने अरेस्ट वॉरट, सुप्रिम कोर्टाची नोटीस सव्हॅलन्सचे ३ पानी इंग्रजी मध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटसअॅपवर पाठवून भिती घालुन तक्रारदार यांना एकुण 21,25,161/- रु इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात विभागणी करुन पाठविण्यास सांगुन त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केल्याबाबत दि.०४/१२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झालेनंतर सायबर एक्स्पर्ट टिमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याव्दारे दिल्ली येथुन आरोपी राघवेंद्र सिंग, पिता मुलचंद वय 38 वर्षे रा. प्लॉट नं. 336, ग्राऊंड फ्लोअर गल्ली नं.02, हायटेंशन रोड, कपासहेडा दक्षिण-पश्चिम नवी दिल्ली. यास दि. 17/03/2026 रोजी अटक केली.

या आरोपीकडुन पोलीस कोठडीदरम्यान त्याचे एकुण ०१ साथीदार निष्पन्न केले असुन, उर्वरीत साथीदाराचा शोध घेत आहेत. गुन्हयात वापरलेला मोबाईल व फसवणुक रकमेपैकी ९,५०,०००/- रु रोख रक्कम हस्तगत करण्यात आली व गुन्हा उघडकीस आणला आहे. उर्वरीत आरोपीत बाबत तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), राजन माने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्रीशैल गजा सोबत पोलीस उप-निरिक्षक नागेश इंगळे, पोसई प्रविण भोपळे, पोहेकॉ गंगावणे, कृष्णात जाधव, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, पोकॉ रतिकांत राजमाने यांनी पार पाडली.


पोलीस आयुक्तालयाकडून नागरीकांना आवाहन

सोलापूर शहरातील लोकांना सोशल मिडीयाव्दारे, वॉटसअॅप कॉल, फोन कॉल करुन हिंदी /इंग्रजी भाषे मध्ये बोलून भिती व समाजात बदनामी होईल अशी भिती दाखवत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडत आहेत. तसेच मनि लाँड्रीग केसमध्ये तुमचा सहभाग आहे, त्यामध्ये तुमचे बँक खाते / एटीएमकार्ड, मोबाईल सिमकार्ड वापरले गेले आहे अशी माहिती देवून तुम्हाला डिजीटल अरेस्टची भिती घालने अशा प्रकारच्या घटने संदर्भात कोणास कॉल अथवा सोशल मिडीयावरुन व्हीडीओ कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद न देता सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय किंवा जवळच्या पोलीस ठाणे येथे तक्रार तसेच नॅशनल सायबर क्राईम पोर्टल टोल फ्रि क्रमांक १९३० वर मोबाईलवरुन संपर्क साधुन तक्रार दाखल करावी.

Post Views: 60
Previous Post

बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

Next Post

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958111

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!