सोलापूर – बार असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 26, 28 व 29 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. 26/03/2026 रोजी सकाळी 8:30 वाजता सोलापूर शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त राजन माने, महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे, चॅरिटी कोर्ट अध्यक्ष ॲड. खतीब, ॲड. संजीव सदाफुले, ॲड. सुभाष देशपांडे, ॲड. विक्रांत फताटे, ॲड. निशिकांत देगावकर, ॲड. शिरीष जगताप, सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. निलेश ठोकडे, निलेश जोशी, माजी सचिव ॲड. मनोज पामुल, ॲड. प्रशांत कांबळे, ॲड. रवि सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील 19 क्रिकेट संघांचे कॅप्टन व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ॲड. मिलिंद थोबडे, उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख तसेच मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर बार असोसिएशनचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर आभार सहसचिवा ॲड. मिरा प्रसाद यांनी मानले.
ही क्रिकेट स्पर्धा तीन दिवस चालणार असून, वकील व न्यायाधीशांमध्ये क्रीडाभावना व एकात्मता वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


























