लोहा – मतदार संघाचे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू खांदे समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी घड्याळाला सोडचिठ्ठी देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यांचे विश्वासू समर्थक आ.आंनदा बोढांरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन हाती धनुष्य बाण घेतला.
नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते लोहा मतदारसंघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक व विस्वास म्हणून ओळखले जानारे नरेंद्र गायकवाड यांना पंचायत समितीमध्ये उपसभापती पदावर संधी मिळवून दिली होती.
पंचायत समितीमध्ये अनेक जन गुडघ्याला बाशिंग बांधून होते पण नरेंद्र गायकवाड हा तळमळीचा कार्येकर्ता म्हणुन ओळख निर्माण केली म्हणून त्यांना उपसभापती पदाची संधी मिळवून दिली. पंचायत समितीच्या उपसभापती पदावर विराजमान केले त्यांचा मतदार संघात उत्तम संपर्क आहे.
समाजकारण असो की राजकारण अनेकांना अडचणी निर्माण केल्या जातात पण अडचणीला न डगमगता त्यांनी पॅंथर पॉवर अॅटो युनियनच्या माध्यमातुन दिवस राञा मिञ मंडळींचा गोतवळा तयार केला .इतर समाजामध्ये सुध्दा गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देत नांदेड येथे शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व दक्षिण मतदारसंघाचे आ.आंनदा बोंढरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आ. आनंदराव पाटील बोंढारकर, शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख विनय गिरडे, शिवसेनेचे दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे आदी उपस्थित होते.
लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश करुन हाती धनुष्य बाण घेतला.
दक्षिण मतदारसंघातील बळीरामपुर जिल्हा परिषद गट एस.सी प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यांना या ठिकाणी संधी मिळुन शकते.या अनुषंगाने या सर्कल मध्ये कामाला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात आ.आंनद बोंढारकर यांना मानणारा वर्ग मोठा आहे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र गायकवाड यांनी कामाला सुरुवात केली आहे.


















