वेळापूर – माळशिरस तालुक्यातील वेळापूर नगरीचे आराध्य दैवत श्री अर्धनारी नटेश्वर यात्रा सोहळ्यानिमित्त आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या महाप्रसाद सोहळ्याला वेळापूर नगरीसह परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी सकाळी ११:०० वाजता आमदार उत्तमराव जानकर यांनी अर्धनारी नटेश्वर मंदिरात येऊन देवाची विधिवत पूजा करून नैवेद्य अर्पण केला. या प्रसंगी पं. स. सदस्या सौ. विमलताई जानकर, धानोरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जीवन जानकर, वेळापूर ग्रामपंचायत सदस्या डॉ. सौ. स्नेहलताई जानकर, रविराज गुरव ,
तसेच वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ आडत व त्यांचे सहकारी, रिपाई (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे, संजय मंडले, अमोल पनासे, सौ. सीमा खाडे, प्रियंका आडत, दीपक राऊत, शंकर आडत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी दिवसभर महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. मंदिर परिसरात महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र मंडप व सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या. दिवसभर चाललेल्या या महाप्रसाद कार्यक्रमात सुमारे ११ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
भाविकांना प्रसाद मिळताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पं. स. सदस्या सौ. विमलताई जानकर यांनी स्वतः लक्ष देत संपूर्ण नियोजन व्यवस्थित पार पडेल याची काळजी घेतली.
या महाप्रसाद कार्यक्रमासाठी वेळापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग, आमदार उत्तमराव जानकर यांचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात्रेनिमित्त आयोजित या महाप्रसाद सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

















