वळसंग – दक्षिण सोलापूर येथील वळसंग या गावचे ग्रामदैवत श्री शंकरलिंग आणि श्री वीरभद्रेश्वर यात्रा येत्या सोमवार दिनांक ६ एप्रिल व मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. सोमवार रोजी श्री शंकरलिंग नंदीध्वज सायंकाळी ०६.०० वा.गावातून मुख्य रस्त्यावरून निघणार आहे व वीरभद्रेश्वर अग्निप्रवेश रात्री नंदीध्वज व पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर संपन्न होईल.
मंगळवार दिवसभर गावच्या भक्तासाठी आणि परगावहून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेला आहे. तसेच मंगळवार रोजी पहाटे श्री शंकरलिंगाचे रुद्राभिषेक आणि सायंकाळी श्री शंकरलिंग मूर्तीचे व नागफणी(भाशिंग) नंदीकोल चे गावातून मिरवणूक निघणार आहे. रात्री ठीक ९-०० वाजता विजापूरचे जयसिंह कला मंचाकडून रसमंजरी कार्यक्रम सादर होणार आहे. त्या दोन्ही दिवशी भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
या दोन्ही दिवसाच्या जत्रेचा तयारी श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी करत आहे. महाप्रसादाचे आणि कार्यक्रमाचे भाविकांनी लाभ घ्यावीत असे आव्हान श्री शंकरलिंग ट्रस्टचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी यांनी केले आहे.
















