देगलूर – अगामी जिल्हापरिषद, पंचायतसमिती, ग्रामपंचायती, जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर या निवडणूक संदर्भात काँग्रेस पक्षाची दि ०४ एप्रिल रोजी देगलूर येथील बंडयाप्पा मठात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे प्रश्न, विचारविनिमय, त्रृटी आणि भविष्यातील योजना यासंदर्भात चर्चा झाली.
देगलूर तालुक्यात चाललेल्या विविध विषयाच्या अनुषंगाने पक्ष संघटन बूथ स्तरावर मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ४ एप्रिल २०२६ रोज शनिवारी देगलूर येथील बंडयाप्पा मठात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर होते तर प्रमुख मार्गदर्शन खासदार रविंद्र चव्हाण हे होते.
यावेळी रामदास पाटील सुमठाणकर, यशपाल भिंगे, श्रावण रॅपनवाड यांची उपस्थित उपस्थिती होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेत संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद आणखी कशी वृद्धिंगत करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले. राज्यात पहिल्या निवडणुकीपासून देगलूर तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. स्व. वसंतराव चव्हाण यांनी देगलूर तालुक्यात काँग्रेस रुजविली ज्यामुळे काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते आज तालुक्यात आहेत. काँग्रेस ही केवळ एक राजकीय संघटना नसून समाजहित आणि लोकशाही मूल्ये जपणारी विचारधारा आहे. आजच्या काळात या विचारधारेची गरज अधिक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आपापल्या पातळीवर लोकांशी सातत्याने संपर्क ठेवत काँग्रेसचा संदेश पोहोचवला पाहिजे.
काँग्रेसचा विचार आणि इतिहास कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घराघरात पर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याचा फायदा आगामी निवडणुकात होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी या मेळाव्याला शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, नवनियुक्त देगलूर तालुकाध्यक्ष विष्णूकांत पाटील शेकापुरकर, जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर, गटनेते शेख मिरामोयोद्दीन, नगरसेवक बालाजी रोयलावार, अविनाश निलमवार, शत्रुघ्न वाघमारे, युवक तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील, वाय जी सोनकांबळे, सुभाष अल्लापूरकर, दिलीप बंदखडके, भरत पाटील, मच्छिंद्र गवाले, महिला तालुकाध्यक्ष डॉ. पुजा गायकवाड, अरूण पाटील हंगरगेकर, राजा कांबळे, हज्जू शेठ, टोके, माधव पाटील शेळगावकर, ईश्ववर देशमुख तसेच तालुक्यातील बुथ प्रमुख, सर्व शक्ती प्रमुख, सर्व शाखा प्रमुख, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व सेल्सचे पदाधिकारी, व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















