हाणेगाव – येथील रहिवाशी सध्या मुक्रामाबाद पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले निर्भीड निस्वार्थ कर्तव्यदक्ष असलेले पोलीस जमादार शिवाजीराव आडेकर यांनी पोलिस दलात अनेक वर्ष सेवा बजावत आहेत त्यांनीं नुकतेच 2013 विभागीय अहर्ता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे व आपल्या कार्याच्या जोरावर पोलीस दलातील एक उच्च पदस्थ पदावर पदोन्नती झाल्यामुळे देगलूर तालुका व तालुक्यातील परिसरात त्यांचे अभिनंदन होताना दिसते आहे तर त्यांना मित्रपरिवार कडून शुभेच्छा देऊन आशीर्वाद देत आहेत.
पोलीस दलात त्यांची गेली वीस ते तीस वर्ष निस्वार्थ कर्तव्यदक्षपणे सेवा करून उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे त्यांनी सेवेत कार्यरत असताना अनेक पोलीस दलातील स्पर्धा व अनेक अहवांनाना निर्भीडपणे तोंड दिले लोकांमध्ये पोलिसांची वचक ठेवून सामान्य लोकांना भयमुक्त जीवन जगण्याचे वातावरण त्यांनी आपल्या सेवा काळात केले शिवाजी आडेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आजच्या पिढीतील युवकांना एक उत्तम असे उदाहरण त्यांनी दाखवून दिले की यश मिळवण्यासाठी पैशाची नाही तर मेहनत, जिद्द, चिकाटी, व अभ्यासाची गरज आहे असे त्यांनी एक उच्च पद घेऊन सर्व युवकांना एक आदर्श दिला त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी ठरेल.
कारण देगलूर तालुक्याच्या हाणेगाव विभागातील किमान 40 ते 50 गावा मधून बौद्ध समाजातील हे प्रथम पोलीस दलातील उच्चपदस्थ असल्यामुळे ते सर्व समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत असताना दिसतो आहे म्हणून शिवाजी धोंडीबा आडेकर यांच्या निवडीबद्दल अनेक पोलीस दलातील अधिकारी, व राजकीय , सामाजिक, क्षेत्रातील व्यापारी क्षेत्रातील, मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या रमेश देशमुख शीळवणीकर , राजेश पंदरगे , प्रा, बालाजी नाईकवाडे , पत्रकार फारुख पटेल,बालाजी हनवटे ग्रामविकास अधिकारी, मधुकर भास्करे, मनोहर भास्करे, दिलीपराव भोसले ,नागूराव साधू, सिद्धार्थ मल्लापुरकर,रमेश शिवणीकर,किशोर आडेकर,वसंत आडेकर व तसेच मुकरामाबाद पोलीस ठाणे चे ए पी आय राजु चव्हाण व मरखेल पोलीस ठाण्याचे कर्मचारी आडेकर परिवार मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

















