Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पानी फाऊंडेशन :- अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाने पटकावला प्रथम क्रमांकाचा फार्मर कप….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 13, 2023
in maharashtra
0
पानी फाऊंडेशन :- अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाने पटकावला प्रथम क्रमांकाचा फार्मर कप….
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे. आधी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार केली. आता फार्मर कप च्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे गाैराेवदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

पानी फाऊंडेशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार साेहळा रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पदमश्री पाेपटरावर पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वच जिल्हयांतून हजाराे शेतकरी गट, शेतकरी महिला गट उपस्थित हाेते. या कार्यक्रमात पानी फाउंडेशनचा राज्यस्तरीय फार्मर कप २०२२ हा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाला देण्यात आला.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो. राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी आणलेल्या याेजनांचाही उल्लेख केला.

 

शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते चांगली प्रगती करू शकतात. म्हणून शेततळे, शेड नेट, पेरणी यंत्र, विविध साधने आणि इतर कृषि निविष्ठा देण्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. शासनाच्या जलयुक्त शिवारालाच जोड म्हणून वॉटर कपने शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी प्रेरित केले. निसर्गाच्या फेऱ्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या क्षमतेची आठवण करून देण्याचे कार्य वॉटर कपने केले आणि ग्रामीण भागातील अनेक गावे जलस्वयंपूर्ण झाली, असाही उल्लेख फडणवीस यांनी आवर्जून केला.

 

सोलर फिडरद्वारे शेतकऱ्यांना १२ तास वीज

दिवसा १२ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी ३० टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षात उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळू शकेल. यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. त्यासोबत फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत नसेल तर अशी शेतजमीन सोलरसाठी ३० वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. ३० वर्षानंतर शेतकऱ्याला जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल.

 

शेतकऱ्यांनी करून दाखविले

पानी फाउंडेशनची कथा सांगितली, तुम्ही केलेले परिवर्तन दाखविले तर निराशेतील शेतकरी पुन्हा उभा राहील आणि हे करण्याकरिता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले. पानी फाऊंडेशनने ४ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे उद्दीष्ट ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

 

आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषि उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे. यावेळी सत्यजित भटकळ आणि पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

 

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील संशोधानाचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सह्याद्री फार्मसीचे विलास शिंदे, विविध पिकांसाठी डिजिटल शेती शाळेचे मार्गदर्शक, विविध पिकांसाठी एसओपी देणारे मार्गदर्शक, कृषि विषयक माहितीपट पडताळणी करणारे तज्ज्ञ, पोकरा प्रकल्पाचे विजय कुवळेकर, एबीपी माझाचे राजीव खांडेकर, पानी फाऊंडेशनला सहकार्य करणाऱ्या संस्था, शेतकऱ्यांसाठी महितीपट निर्मितीत सहकार्य करणारे, कृषि तज्ज्ञ आदींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, कृषी सचिव एकनाथ डवले. अभिनेते अतुल कुलकर्णी, सहयाद्री ॲग्राे फार्मचे विकास शिंदे, राहूरी कृषी विदयापीठाचे कुलगूरू डाॅ. प्रशांत पाटील, पंजाबराव कृषी विदयापीठाचे कुलगूरू डाॅ. शरद गडाख आदी उपस्थित हाेते.

 

यावेळी ध्वनीचित्रफीत आणि शाहीर अवधूत गांधी, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या पथकाने सादर केलेल्या नृत्याविष्काराच्या माध्यमातून पानी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली. नीरज नारकर व स्पृहा जाेशी यांनी सुत्रसंचालन केले.

 

पानी फाउंडेशन आयाेजित राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेतील विजेत्यांची नावे

प्रथम पुरस्कार- परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरुड , जि. अमरावती, रक्कम २५ लाख

दवितीय पुरस्कार- चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद, रक्कम १५ लाख रूपये

संयुक्त तृतीय पुरस्कार – जय याेगेश्वर शेतकरी गट , डांगर बुद्रूक, ता. अंमळनेर, जळगाव

रक्कम ५ लाख रुपये

संयुक्त तृतीय पुरस्कार – उन्नती शेतकरी गट, वारंगा तर्फे नांदापूर , ता. कळमनुरी, जि. हिंगाेली,

रक्कम ५ लाख रुपये

Post Views: 103
Previous Post

VIDEO पहा – उत्तर प्रदेश येथे 3500 कोटी रुपयांच्या 9 राष्ट्रीय महामार्ग

Next Post

लातूरात पोलिसांची छापेमारी. 58 व्यक्ती विरोधात 50 गुन्हे…8 लाख 45 हजार 435 रुपयाचा मुद्देमाल जप्त….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लातूरात पोलिसांची छापेमारी. 58 व्यक्ती विरोधात 50 गुन्हे…8 लाख 45 हजार 435 रुपयाचा मुद्देमाल जप्त….

लातूरात पोलिसांची छापेमारी. 58 व्यक्ती विरोधात 50 गुन्हे...8 लाख 45 हजार 435 रुपयाचा मुद्देमाल जप्त....

ताज्या बातम्या

चेंबर दुरुस्ती, बॉक्स कल्व्हर्ट पुलची आयुक्तांनी केली पाहणी

April 22, 2026

महिला आरक्षण विधेयकाच्या निषेधार्थ भाजपने केले जोरदार आंदोलन

April 22, 2026

अतिक्रमणांवर बुलडोझर पण बसस्थानकाच्या कामावर मौन

April 22, 2026

सह्याद्री कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर नशा मुक्ती जनजागृती

April 22, 2026

समर्पण भावना हीच यशाची गुरुकिल्ली

April 22, 2026

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0824246

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697