सोलापूर – सामाजिक क्षेत्रातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिरीष जगदाळे यांनी सोमवारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.
राज्याचे उप मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे व युवकांचे आशास्थान खा. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख खा. धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खा. धैर्यशील माने यांनी जगदाळे यांचे भगवा उपरणे घालून स्वागत केले आणि त्यांच्यावर सोलापूर शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करण्यास सांगितले.
”केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारण करण्यासाठी सत्तेचा योग्य वापर व्हावा या विचाराने मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वसामान्यांसाठीचे काम आणि शिवसेनेचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे शिरीष जगदाळे यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे उत्तम प्रकाश खंदारे आरोग्यदूत मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, मनीष काजळे, आदी उपस्थित होते.


























