अकलूज – भारतीय जनता पार्टीचा 46 वा स्थापना दिन अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोटर सायकल रॅलीने उत्साहात स्थापना दिन साजरा करण्यात आला.
प्रथम राष्ट्र, सुशासन, विकास, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रावर उभी राहिलेली विचारधारा म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी पासून पेटलेली ही विचारांची ज्योत आजही त्याच तेजाने राष्ट्रसेवेच्या मार्गावर प्रज्वलित आहे या मूल्यांच्या बळावर राष्ट्रनिर्माणाचा संकल्प अधिक दृढ करणाऱ्या देशातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो..
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ संस्कृती ताई सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेवराव जी कावळे व भाजपच्या सर्व पदाधिकारी यांनी स्थापना दिनानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेले होते मोटरसायकल रॅली अकलूज नगर परिषद कार्यालय येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सदुभाऊ चौक गांधी चौक विजय चौक शिवापूर पेठ ते मारुती मंदिर या ठिकाणी मोटरसायकल रॅलीची सांगता करण्यात आली. मोटरसायकल रॅलीत महिला पदाधिकारी तरुण कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतलेला होता. रॅलीच्या सांगता वेळी भाजपचे निष्ठावान व ज्येष्ठ मंडळी यांचा सन्मान करण्यात आला एडवोकेट संजय दोशी, बाळासाहेब वावरे यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला..
समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीतही राम सातपुते यांनी उपस्थित रॅलीतील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय समर्पणेने आणि निष्ठेने काम केले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून आपण करत आहात. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते, कारण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आपण सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे, भारतीय जनता पार्टीचे काम निश्चितपणे उंचीवर नेऊया, असे बोलून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.






















