बार्शी – ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त व महावीर सारीज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होम मिनिस्टर अर्थातच खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.सोनम जगताप (पोलीस उपनिरीक्षक,बार्शी शहर) तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गझल कटारिया (संचालिका, महावीर सारीज) व सौ. राधिका पंडित (कल्याणी ज्वेलर्स) या उपस्थित होत्या तर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रा.माधुरी शिंदे, सौ.अदिती तिवारी व सौ.शितल उलभगत याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सदस्य अनिल खुडे सर यांचा मुलगा अजिंक्य खुडे यांची सोलापूर ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धेत बार्शीतील बहुसंख्य महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये पाच हजार एक किमतीची मानाची पैठणी हे सौ. रेश्मा मगर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन हजार एक किमतीची मानाची पैठणी हे सौ. अश्विनी चव्हाण व तृतीय क्रमांकाचे बक्षीस सोन्याची नथ हे सौ. रेणुका ढोबळे यांना मिळाले. त्याचबरोबर कै. रामराव वाणी यांच्या स्मरणार्थ राहुल वाणी अध्यक्ष यांनी एकूण वीस बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्यांना दिली.
होम मिनिस्टरचे सादरकर्ते म्हणून राहुल झोबांडे यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, उपाध्यक्ष संतोष शेळगावकर, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार माणकोजी ताकभाते, सुरेंद्र जंगम, विजय येवारे, दिपक ढोणे, अतुल वाणी प्रा. रतिकांत हमणे, प्रा. हेमंत शिंदे महिला सदस्यामध्ये सौ. कोमल वाणी, माधुरी वाणी, सायरा मुल्ला, रागिनी झेंडे, रेखा विधाते, सुजाता अंधारे, अनुसया आगलावे अशादेवी स्वामी, त्रिशाला मिसाळ, अरुणा शेळगावकर, संतोषी शेवते सोनाली घोंगाणे, राधा घोंगाणे हया उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. चंद्रकांत उलभगत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रयत्न केले.



















