श्रीपूर – महाराष्ट्रातील साखर उद्योगामुळे प्रत्यक्ष दोन लाख कर्मचारी तसेच १० लाख ऊस तोडणी मजूरांना रोजी रोटी मिळते . अप्रत्यक्ष व्यापार , उद्योग करणारे वेगळेच आहेत . साठ हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या साखर उद्योगामुळे सरकारला दरवर्षी ९ हजार कोटींची कर मिळतो सर्वात महत्वाचे म्हणजे हा उद्योगा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने हा उद्योग वाचला पाहिजे असे उद्गार एम . एस . सी . एस . एफ चे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी काढले .
श्रीपूर ता . माळशिरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साखर उद्योगा पुढील अडचणी व उपाय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते .
प्रथम चर्चासत्राचे संयोजक कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ .यशवंत कुलकर्णी यांनी उपस्थित आमचे स्वागत केले .
यावेळी मंचावर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक डी . एस . टी . ए .चे अध्यक्ष रोहन शिरगावकर , एम . सी . डी . सी .चे मंगेश तिटकारे उपस्थित होते .
साखर उद्योगाच्या अडचणी विषयी बोलताना खताळ पुढे म्हणाले की , चालू गळीत हंगामाचा विचार करता शासन नियमा प्रमाणे एफ आर पी ची द्यावी लागणारी रक्कम आणि साखर विक्रीची कारखान्यांना मिळणारी रक्कम ( ३७०० रु ) पाहता यावेळी टना मागे ३५० रु तोटा झाला . महाराष्ट्रतील एकूण कारखान्यांना मिळून १७०० रु . कोटी घाटा झाला असून उद्योगा बाबत गंभीर बाब आहे .
*बदलत्या धोरणांचा फटका *
सद्य स्थितीत साखर उद्योग सरकारच्या नियंगणात असल्याने उद्योगाच्या धोरणा विषयी सातत्याने होणारे बदल, नैसर्गिक आपत्ती , कमी दिवस चालणारा गळीत हंगाम या सर्वांचा विपरीत परिणार या उद्योगवर होत असून यावर सर्व स्तरातून उपाययोजना होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सोहम शिरगावकर यांनी केले .या चर्चासत्रात मोठ्या प्रमाणावर साखर उद्योगातील कार्यकारी संचालक यांनी सहभाग घेतला होता .
या बरोबरच मंगेश तिटकारे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ . सुधीर पोफळे यांनी केले .
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . साखर उद्योग नफ्यात नाही चालला तर भवितव्य वाईट आहे .
आज शेतकरी वर्गाची मानसिकता बदलली आहे . जादा साखर उतारा देणारी ऊस लागवड कमी होत आहे , त्यातच संघटनेच्या माध्यमातून बसत नसताना बळजबरीने ऊस दर मागतीला जातो . त्यामुळे जो पर्यंत नफ्या तोट्याचा विचार होत नाही तो पर्यंत हा उद्योग टिकणार नाही .
– प्रशांतराव परिचारक चेअरमन .






















