मोडनिब – माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महात्मा जोतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.सकाळी दहा वाजता दत्त चौक, ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले यांचा सामाजिक सुधारणांचा वारसा पुढे चालविण्याचा संकल्प महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीने केला.प्राथमिक आरोग्य केंद्र, मोडनिंब येथे मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये दमा, मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब, डेंग्यू, मलेरिया, सर्पदंश, विषबाधा तसेच विविध श्वसनाच्या आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले.या मोफत शिबिराचा एकूण ९२ नागरिकांनी लाभ घेतला. तज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले.
यावेळी दामोदर माळी, डॉ. प्रशांत कोल्हे, मृदुल माळी,रोहन माळी, किरण यादव, ऋषी यादव, ओंकार नामदे, ओंकार कोळी, माऊली माळी. बालाजी माळी, मयुर नामदे,मंगेश माने, सर्वपक्षीय नेते, समाजबांधव, ग्रामस्थआणि नागरिक आदी उपस्थित होते.





















