श्रीपूर – भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलेल्या मुकनायक या वृत्तपत्राचे ध्येयवाक्य (स्लोगन ) जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगातील बोलावे बरे , बोलावे खरे , कोणाच्याही मनावर पडू नये चरे , शब्दांमुळे दंगल , शब्दांमुळे मंगल – जागृत रहावे , जीभेवर ताबा , सर्वसुखदाता , पाणी वाणी नाणी नासू नये असे होते . आजच्या सामाजिक परिस्थितित डॉ . बाबासाहेब आंबेडरांना अभिप्रेत असलेला समाज घडवायचा असेल तर या ध्येयवाक्या प्रमाण सर्वांचे आचरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स . म . साखर कारखान्याचे संचालक ऍड . प्रकाशराव पाटील यांनी केले .
श्रीपूर ता .माळशिरस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ तसेच स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते .यावेळी व्यासपीठावर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी महाळुंग – श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील ,नगरसेवक राहुल रेडे – पाटील ,पै . अशोक चव्हाण , प्रकाश नवगिरे ,पं . स . चे माजी सदस्य अनिल जाधव , अनिल मुंडफणे , डॉ .हरिश्चंद्र सावंत – पाटील , शामराव भोसले , मौला पठाण , भाऊसाहेब कुलकर्णी स्मारक व जयंती उत्सव समिती अध्यक्ष समाधान लांडगे , तेजस बाबर ,
बी . टी . शिवशरण, संदीप घाडगे , गौतम आठवले ,तुकाराम बाबर ,बापूराव पोळके ,अनिल आठवले , सचिन ताकतोडे , ज्ञानेश्वर काटे , अरविंद लोंढे , उपस्थित होते .
तर डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी बौद्ध धर्माने सांगितलेले पंचशिलाचे व डॉ . बाबासाहेब यांनी सांगितलेला शिका, संघटित व्हा , संघर्ष करा याप्रमाणे आचरण केले तर जगातील कोणतीच शक्ती आपला विकास रोखू शकणार नाही असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत आठवले यांनी तर आभार दत्ता नाईकनवरे यांनी मानले .
याबरोबरच थोरला राजवाडा , महामानव प्रतिष्ठान , जिगरबाज ग्रुप , प्रबुद्ध प्रतिष्ठान यांच्या वतीनेही डॉ . आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली .
श्रीपूर मध्ये भव्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असल्याने आजूबाजूच्या गावांतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते येवून अभिवादन करत होते .
इशिता व माही या चिमुलकलिंनी लक्ष वेधले
अतिशय समर्पक तितक्याच खड्या आवाजात व अभ्यास पूर्ण भाषणांत इशिता गायकवाड व माही दीपक ताकतोडे या दोन चिमुलकलींनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा उल्लेख करून केलेले अभिवादनाने उपस्थितांचे लक्ष वेधले .


















