पंढरपूर – महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेऊन खर्या अर्थाने महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी करीत असताना अशा पद्धतीने समाजाभिमुख असा उपक्रम सर्व समाज बांधवांनी राबवीला पाहिजे.
या भावनेतून वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात निर्णय समाजबांधवां कडून घेण्यात आला.त्या नुसार समाजबांधव एकत्रित आले आणि स्वच्छता अभियानस सुरूवात झाली.
काही तासांतच रूपडे देखील पालटले.येत्या १९ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी होणार आहे.जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
दरम्यान या स्मशानभूमीत स्वच्छता अभियानास श्वेता डोंबे,आरती बसवंती, निलराज डोंबे,अनंत कटप, मयुर भिंगे,विशाल आर्वे, युवराज मुंचलंबे, महेश विभुते, प्रशांत मेनकुंदळे, गिरिष पंतोजी-पाटील, गंगाधर स्वामी,लल्लू स्वामी,ओंकार बसवंती,सागर स्वामी,अनंत मेनकुंदळे आदींसह वीरशैव लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.























