बार्शी – भगवंत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांच्या तुफान गर्दीने सुरु झालेल्या न्यु होम मिनिस्टर कार्यक्रमात नुकतीच रंगत सुरु होण्यास सुरुवात झाली अन त्याच दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने महिलांचा काहीसा हिरमोड झाला. मात्र संयोजकांनी लवकरच हा कार्यक्रम पुन्हा एकदा घेण्याचे जाहीर केले.
भगवंत मैदानावर भगवंत महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला. पहिलाच दिवस अन हजारो महिलांची उपस्थित होती. क्रांती नाना मळेगावकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात ही जोरदारपणे केली. लग्न होऊन दहा वर्षे झालेल्या महिला व्यासपीठावर बोलावून त्यांच्याकडून उखाणे म्हणून घेण्यास सुरुवात झाली अन विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली अन कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला.
क्रांती नाना मळेगावकर हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय अभिनेते असून त्यांनी ‘न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा)’ या कार्यक्रमात दमदार एन्ट्री घेतली. विनोदी शैली आणि वहिनींशी संवाद साधण्याच्या पद्धतीमुळे महिलांचा उत्साह वाढला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बार्शीतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत, ज्ञानवंत व कर्तव्यनिष्ठ महिलांचा भगवंत महोत्सव समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
उद्घाटक म्हणून वर्षा ठोंबरे व कविता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवात श्री भगवंतांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
बार्शी नगरपरिषदेतील महिला नगरसेविका, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समितीचे सभापती मीनाक्षी रोंगे, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील महिला सदस्य तसेच भगवंत महोत्सव निवड समिती सदस्य यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.
सन्मानित महिलांची नावे- प्रा. डॉ. उषा गव्हाणे, डॉ. स्मिता यादव, डॉ. वर्षा मोरे, डॉ. अजिता गंभीर, डॉ. सारंग बुरगुटे, डॉ. कविता बेनवडे, डॉ. गीतांजली पाटील, प्रा. स्मिता सुरवसे, प्रा. लाजवंती राठोड, कांचन गुंड, बबीता गवळी,
डॉ. ज्योती माळी निंबाळकर, ऍड. वंदना नीलकंठराव जगनाडे, प्रा. मंजुश्री श्रीमंगल, अमृता कुंकूलोळ, गौरी पाटील, कविता अंधारे, नेहा घाडगे, पाली फाटक, सोनाली रामगुडे, अनुश्री महिंद्रकर, सनवी दत्तात्रय मोरे, तृप्ती किसन मंगरुळे, विद्या दत्तात्रय काळे, वैष्णवी श्याम कळसाईत, शिल्पा सरवदे, सीमा रुद्रवार, योगिता कटारिया, सुखदा नाईक, ऍड. जयश्री शिवाजी घोडके, प्रा. प्रणाली अनिकेत तायडे, ऍड. योजना घोलप, ऍड. अनुराधा मनगिरे, ऍड. सारिका कोकाटे, ऍड. वृषाली वाघमारे. सूत्रसंचालन प्रा. विजयश्री संजय पाटील यांनी दिमाखदार पद्धतीने केले.






















