लक्षवेधी द्वारे आज विधान परिषदेत उजनी धरणाच्या गाळाच्या उपसा बाबतचा मुद्दा उपस्थित केला. उजनी धरणामध्ये ६३ टीएमसी मृत साठा आहे. ५३ टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. तर १३ टक्के गाळ धरणार साठला आहे. १३ टक्के म्हणजे जवळपास साडेसहा टीएमसी गाळ मिश्रित वाळू आहे. मेरी आणि वॉटर कमिशन ने दिलेल्या अहवालानुसार जवळपास ९० कोटी ब्रास वाळू तर ६० कोटी ब्रास गाळ आहे.
उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे आवश्यक आहे. मेरी या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार ५१ हजार कोटी रुपयांची वाळू या धरणात उपलब्ध आहे. यातून शासनास उत्पन्न स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. यासाठी उजनी धरणातील गाळ काढण्यासाठी शासन काय प्रयत्न करणार अशी विचारणा लक्षवेधीद्वारे केली.
यावर उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर देतांना पुढील एक ते दीड महिन्यात नवीन मानके ठरवून धरणातील गाळ काढण्याबाबत निविदा मागविण्यात येतील अशी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार..!
Post Views: 146