सोलापूर : वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड सायन्सचे प्रा. परमेश्वर कमळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. ते वालचंद महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापनाचे कार्य करतात.
” सोलापूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचा चिकित्सात्मक आर्थिक अभ्यास” या विषयावर संशोधन करून आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. सदर विषयाच्या संशोधनासाठी त्यांना द.भै.फ.दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.दामजी यांचे मार्गदर्शनाखाली लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल वालचंद शिक्षण संस्थेचे समस्त विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी, उपप्राचार्य डॉ.मनोहर जोशी, डॉ.राजशेखर हिप्परगी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रगण आदींनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.























