सोलापूर : शहरातील संगीतप्रेमींसाठी राज स्टुडिओ सोलापूर व धनश्री ऑर्केस्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने, भीमाशंकर भालके प्रस्तुत अलका याग्निक नाईट’ हा बहारदार गीत-संगीताचा कार्यक्रम शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सोलापुरातील नामांकित व गुणी कलाकारांचा सहभाग असणार असून, प्रेक्षकांना हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली गीते आणि सुरेल सादरीकरणाचा आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रमात भक्ती महामुनी, धनश्री सरगुले, सायली साठे, अनिता अय्यर, साक्षी देवस्थळी, मेघा हुळळे-साळुंखे, अनुराधा गंगुल यांसह अनेक गायक-गायिका आपली कला सादर करणार आहेत. तसेच अतुल स्वामी, भीमाशंकर भालके, अशोक बिराजदार, विनायक सरगुले, राहुल कौलगुड, सनी भंडारी, भूषणकुमार स्वामी, भागवत जठार, राजकुमार कोकळगी, शिवदास भंडारी, प्रसाद भालके आदी कलाकारही या मैफलीत रंगत आणणार आहेत.
विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—


















