Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एमआयडीसी-कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ; गुंतवणूक, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्यास चालना

तरुण भारतbyतरुण भारत
April 26, 2026
in editor
0
एमआयडीसी-कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ; गुंतवणूक, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्यास चालना
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली: कोरियन कंपन्यांचा महाराष्ट्रातील गुंतवणुकीकडे वाढता कल लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सी (कॉस्मे) यांच्यात दि. २० एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथे गुंतवणूक प्रोत्साहन, कौशल्यविकास आणि औद्योगिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.


महाराष्ट्रातील कोरियन गुंतवणूकीच्या संधी, औद्योगिक सुलभीकरण, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत पुणे येथे नुकत्याच झालेल्या परिषदेत एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आणि कॉस्मेच्या उच्चस्तरीय अधिका-यां समवेत सविस्तर चर्चा झाली आहे. सदर चर्चेचा पुढील भाग म्हणून हा करार आकाराला आला असून, यावेळी एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महाव्यवस्थापक (पणन) डॉ. विकास सूर्यवंशी तर कॉस्मेचे उपाध्यक्ष जंग झुंग पार्क यांच्या समवेत इतर अधिकारी उपस्थित होते.


कराराचा मुख्य उद्देश कोरियातून महाराष्ट्रात गुंतवणूक सुलभ करणे आणि राज्यातील विद्यमान कोरियन उद्योगांच्या विस्तार योजनांना पाठबळ देणे हा आहे. सहकार्याची रचना तीन प्रमुख टप्प्यात करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात कोरियन एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींचे प्रोत्साहन आणि सुलभीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण, क्षमता विकास आणि उद्योगाभिमुख कौशल्यवृद्धीच्या माध्यमातून भविष्यातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रगत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण, औद्योगिक आधुनिकीकरण, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि शाश्वत उत्पादनासाठी सहकार्याचा शोध घेतला जाणार आहे.


गुंतवणूक सुलभीकरणाअंतर्गत कोरियन एमएसएमई आणि स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्रातील संधींबाबत जनजागृती करणार आहे. दोन्ही संस्था भारत आणि कोरिया येथे गुंतवणूक शिष्टमंडळे, व्यवसाय मिशन्स आणि रोडशो आयोजित करण्यास सहकार्य करतील. तसेच क्षेत्रनिहाय गुंतवणूक संधी आणि औद्योगिक प्रकल्पांबाबत माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. कोरियन कंपन्यांसाठी सिंगल विंडो सुलभीकरण यंत्रणा मजबूत करण्यासाठी एमआयडीसी नोडल संस्था म्हणून समन्वयाची भूमिका बजावेल.

महाराष्ट्रातील विद्यमान आणि नव्याने येणाऱ्या कोरियन उद्योगांकरीता व्यवसाय सुलभतेसाठी औद्योगिक निर्देशिका तयार करण्याचाही विचार या करारात आहे. तसेच उत्पादन, असेंब्ली आणि लॉजिस्टिक्ससाठी योग्य औद्योगिक क्षेत्रे, जमीन पर्याय आणि मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास दोघांकडून सहकार्य केले जाणार आहे.


कॉस्मेमार्फत कौशल्य विकासासाठी कोरिया बिझनेस कल्चर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी कॉस्मे अभ्यासक्रम, प्रशिक्षक आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणार असून, एमआयडीसी प्रचलित धोरणांनुसार पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्याचा विचार करणार आहे.


तंत्रज्ञान सहकार्याच्या अंतर्गत ऊर्जा कार्यक्षम स्मार्ट औद्योगिक वसाहती, स्मार्ट ग्रिड्स, नवीकरणीय ऊर्जा, एकात्मता आणि ऊर्जा-ऑप्टिमायझेशन प्रणाली यावर माहितीची देवाणघेवाण आणि संभाव्य सहकार्याचा शोध घेतला जाणार आहे. औद्योगिक आधुनिकीकरण, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत उत्पादनाला चालना देणे हा या करारातील महत्त्वाचा उद्देश आहे.

Post Views: 12
Previous Post

वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा निकाल जाहीर; गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात

Next Post

करमाळ्याच्या कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
करमाळ्याच्या कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव 

करमाळ्याच्या कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव 

ताज्या बातम्या

भोंदू मनोहर भोसलेसह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

April 26, 2026

सिव्हिल मधील डॉक्टरांनी स्वतःच्या हातावर केला वार.

April 26, 2026

बाळे येथे तेरा वर्षांचा मुलीचा बालविवाह रोखला

April 26, 2026

बागेश्वर बाबा महाराजांबाबत बरळले फडणवीस काय म्हणाले..? #marathinews

April 26, 2026
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता

राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता

April 26, 2026
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले

April 26, 2026
अतिक्रमणामुळे झाकाळलेला ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुज झाला खुला

अतिक्रमणामुळे झाकाळलेला ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुज झाला खुला

April 26, 2026
मुलींच्या स्वप्नांना आता निवासी शिस्तीची जोड; ‘श्रीराधा गुरुकुल’च्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलींच्या स्वप्नांना आता निवासी शिस्तीची जोड; ‘श्रीराधा गुरुकुल’च्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0831080

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697