सोलापूर – समाज कल्याण विभाग, सोलापूर व दक्षिण पंचायत समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समानता सप्ताहानिमित्त इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोजकुमार राऊत (गट विकास अधिकारी, पंचायत समिती दक्षिण सोलापूर) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण अधिकारी श्री. कांबळे, सौ. जयश्री सुतार (गटशिक्षणाधिकारी) तसेच श्री. गुरुबाळ संके (विस्तार अधिकारी) पंचायत समिती दक्षिण सोलापूर हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राठोड यांनी विशेष प्रयत्न केले, तर स्वामी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे परीक्षण हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जबाबदारीने केले. यावेळी मुख्याध्यापिका मेराजबानो शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वक्तृत्व स्पर्धेत कुंभारी येथील एस. एस. म्हेत्रे उर्दू हायस्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थी झैद अझरुद्दीन मुंडेंवाडी याने उत्कृष्ट भाषण सादर करून तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या यशामध्ये सहशिक्षिका क्यू. बी. शेख व एच. एन. शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

























