Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अंगणवाडी ताईंच्या नाचणी, बीट, सोयाबीन, टीएचआरपासून १०० पौष्टिक पाककृतींना मिळाली दाद

तरुण भारतbyतरुण भारत
April 26, 2026
in editor
0
अंगणवाडी ताईंच्या नाचणी, बीट, सोयाबीन, टीएचआरपासून १०० पौष्टिक पाककृतींना मिळाली दाद
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महिला व बालविकास विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभर आठवा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सर्व ग्रामीण प्रकल्पांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. या पोषण पंधरवड्याचा समारोप टेंभुर्णी येथील प्रतिष्ठा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे, अश्विनी दळवी, वंदना कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पंचायत समिती पदाधिकारी तसेच विविध बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांनी अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या पौष्टिक पाककृती प्रदर्शनाला भेट दिली.

   शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले पदार्थ, नाचणी, बीट, सोयाबीन तसेच शासनाच्या टीएचआरपासून बनविलेल्या जवळपास १०० विविध पौष्टिक पाककृतींना उपस्थितांनी विशेष दाद दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविकात पोषण पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. बालकांच्या आयुष्यातील पहिली सहा वर्षे मेंदू विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यादृष्टीने अंगणवाडी केंद्रांमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मेंदूचा सुमारे ६० टक्के विकास होत असल्याने या काळात मुलांचा स्क्रीन टाइम कमी ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविका या गावपातळीवरील योजनांच्या प्रभावी दूत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागात पोषणाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात दीपक वैद्य यांनी बालकांच्या पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मिशन वात्सल्य अंतर्गत सुरू असलेल्या एकल महिलांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती देत पात्र महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेविकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी बालकांना विद्यारंभ प्रमाणपत्रे, मातांना बेबी केअर किट, पूर्वशालेय साहित्य, आयुष्यमान भारत कार्ड तसेच विविध योजनांचे लाभ मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. किशोरी व महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागातील आशा वर्कर व आरोग्य सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

उपस्थित मान्यवरांनी बालसंगोपन, मातृआरोग्य, अंगणवाडी सेविकांचे समाजातील योगदान आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले.

समारोपावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांनी पोषण शपथ देऊन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार अधिकारी आकाश कोकाटे, पर्यवेक्षिका अनुराधा मिस्कीन, लता पाटील तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 46
Previous Post

उद्योजीका भाग्यश्री आवळे यांचा बार्शी आगारात सत्कार

Next Post

झेडपीच्या कारभाराला येणार गती ; सीईओ कुशल जैन यांचा पाच विभागांचा धडाकेबाज आढावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
झेडपीच्या कारभाराला येणार गती ; सीईओ कुशल जैन यांचा पाच विभागांचा धडाकेबाज आढावा

झेडपीच्या कारभाराला येणार गती ; सीईओ कुशल जैन यांचा पाच विभागांचा धडाकेबाज आढावा

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबा महाराजांबाबत बरळले फडणवीस काय म्हणाले..? #marathinews

April 26, 2026
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता

राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता

April 26, 2026
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले

April 26, 2026
अतिक्रमणामुळे झाकाळलेला ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुज झाला खुला

अतिक्रमणामुळे झाकाळलेला ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुज झाला खुला

April 26, 2026
मुलींच्या स्वप्नांना आता निवासी शिस्तीची जोड; ‘श्रीराधा गुरुकुल’च्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलींच्या स्वप्नांना आता निवासी शिस्तीची जोड; ‘श्रीराधा गुरुकुल’च्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
झेडपीच्या कारभाराला येणार गती ; सीईओ कुशल जैन यांचा पाच विभागांचा धडाकेबाज आढावा

झेडपीच्या कारभाराला येणार गती ; सीईओ कुशल जैन यांचा पाच विभागांचा धडाकेबाज आढावा

April 26, 2026
अंगणवाडी ताईंच्या नाचणी, बीट, सोयाबीन, टीएचआरपासून १०० पौष्टिक पाककृतींना मिळाली दाद

अंगणवाडी ताईंच्या नाचणी, बीट, सोयाबीन, टीएचआरपासून १०० पौष्टिक पाककृतींना मिळाली दाद

April 26, 2026
उद्योजीका भाग्यश्री आवळे यांचा बार्शी आगारात सत्कार

उद्योजीका भाग्यश्री आवळे यांचा बार्शी आगारात सत्कार

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0830932

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697