बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व छत्रपती ग्रुपचे मार्गदर्शक विजयसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता नववीत शिकणाऱ्या कु. अनुष्का शिरीष शिंदे हिला अकरा हजारांची मदत करण्यात आली.
अनुष्काच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे कु. अनुष्काच्या नावाने श्री भगवंत मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. येथे ही रक्कम फिक्स डिपॉझीट करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक विजय नाना राऊत, माजी नगराध्यक्ष रमेशअण्णा पाटील, डॉ. गणेशकुमार सातपुते, किरण कोकाटे, पत्रकार संजय बारबोले, चंद्रकांत करडे, विजय कोरे, छत्रपती ग्रुपचे सचिव बापूसाहेब पवार, किरण कोकाटे, जय शिवराय प्रतिष्ठान अध्यक्ष विजय राऊत, ऍड. गणेश हांडे, अंकुश नान्नजकर, उडान फाउंडेशनचे शकीलभाई मुलाणी, अमोल डिसले, तानाजी नवले, अजित कदम, अमर लोमटे, सावंत, जाफर शेख, अनिल दळवी, अमोल पाटील, छत्रपती ग्रुपचे टिंकू पाटील, अमोल पाटील, दत्ता मुकटे, नागेश मोहिते रोहित मोहिते, अखिल पठाण, मयूर पवार, सागर थोरात, कोमल लाड, दिनेश सदाफुले, विजय चव्हाण, समाधान राऊत, राहुल आसवदे, रवी मस्के, भगवान जाधव, प्रवीण पिचके, गोविंद थोरात, नागेश जाधव, रोहन भगत, अभिजीत चव्हाण, पृथ्वीराज पाटील, गणेश कोल्हे, श्रावण भालेराव, पिंटू छापेकर, रोहित देवकते, दत्ता गात, सचिन सुपेकर, सचिन शिंदे, चिकू डाके, चिऊ शिंदे, बप्पा हुळे व मित्र परिवार उपस्थित होते.
वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून असा नावीन्यपूर्ण उपक्रम केल्याबद्दल नाना राऊत यांनी छत्रपती ग्रुपचे कौतुक केले.


























