Monday, April 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र – प्रमोद बापट

तरुण भारतbyतरुण भारत
April 27, 2026
in editor
0
पंढरपूर संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र – प्रमोद बापट
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – भारतीय संस्कृती प्राचीन आणि जागतिक स्तरावर वंदनीय आहे. मात्र, जेंव्हा जेंव्हा आपल्याला एकता, एकात्मता, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा विसर पडला, तेंव्हा तेंव्हा समाजाची अवनिती झाली आणि देश पारतंत्र्यात ढकलला गेला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले.

पंढरपूर जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. वैचारिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील विविध मान्यवरांसाठी या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘हिंदुत्व’, ‘राष्ट्रभक्ती’ आणि ‘सामाजिक परिवर्तन’ या विषयांवर मंथन करण्यात आले.

प्रमोद बापट यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संस्कृतीची महती आणि वर्तमानातील आव्हाने यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही प्राचीन आणि विश्ववंद्य आहे. अनेक परकीय आक्रमणे झाली, त्या काळात आपल्या संस्कृतीचे तत्त्व काहीसे अधोमुखी झाले, पण ती कधीही नष्ट झाली नाही.ज्या ज्या वेळी आपण एकता, एकात्मता, समता आणि बंधुत्व विसरलो, त्या त्या वेळी समाजात अवनिती निर्माण झाली आणि देश पारतंत्र्यात गेला. आजच्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला हक्क विचारण्याचे स्वातंत्र्य आहेच, पण त्यासोबतच आपल्यामध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण होणे ही काळाची गरज आहे.हिंदुत्वाच्या अनेक व्याख्या केल्या जातात, मात्र संघाची शाखा हे प्रत्यक्ष हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे ठिकाण आहे. राष्ट्र वैभवासाठी आणि समाज परिवर्तनासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी डॉ. सचिन लादे यांनी संघाने हाती घेतलेल्या पंचपरिवर्तन या विषयवार मांडणी केली. कुटुंब प्रबोधन म्हणजे कौटुंबिक मूल्ये जपणे. नागरी कर्तव्य म्हणजे जबाबदार नागरिक म्हणून वागणे. स्वबोध याचा अर्थ आपल्या मुल्यांची आणि संस्कृतीची जाणीव ठेवणे. जातीभेद विसरून समाज एकसंध करणे म्हणजे समरसता व पर्यावरणाचे महत्व जाणून निसर्गाचे रक्षण करणे. यासंदर्भात मार्गदर्शन करून डॉ.लादे यांनी उपस्थित मान्यवरांना या विषयात योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांशी प्रमुख वक्त्यांनी संवाद साधला व अनेक विषयांवर चर्चा घडून आली.

या चर्चेचे संचालन संजय कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी जिल्हा संघचालक डॉ.रमेश सिद, पंढरपूर जिल्हा कार्यवाह प्रतापसिंह टकले, प्रांत प्रचार मंडळ सदस्य नरेंद्र जोशी, पंढरपूर तालुका संघचालक सुधाकर जोशी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास करांडे, स्वेरी कॉलेजचे प्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यावेळी उपस्थित होते. जिल्हा सहप्रचार प्रमुख जितेंद्र अंतुरकर यांनी स्वागत केले, शाम उत्पात यांनी सांघिक पद्य म्हटले, जिल्हा प्रचार प्रमुख स्वानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आभार ऍड महेश वाळूजकर यांनी मानले तर तुकाराम चिंचणीकर यांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास पंढरपूर शहरातील डॉक्टर, वकील, शिक्षक, उद्योजक आणि वैचारिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रनिर्माणाच्या या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post Views: 11
Previous Post

जागतिक हिवताप दिनानिमित्त सोलापुरात जनजागृती रॅली

Next Post

रोजगार मेळाव्यात 90 युवक-युवतींना ऑफर लेटर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रोजगार मेळाव्यात 90 युवक-युवतींना ऑफर लेटर

रोजगार मेळाव्यात 90 युवक-युवतींना ऑफर लेटर

ताज्या बातम्या

श्री जिन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहात

श्री जिन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहात

April 27, 2026
मातृभाषेच्या अभिमानाबरोबरच इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करा – सचिन उकिरडे

मातृभाषेच्या अभिमानाबरोबरच इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करा – सचिन उकिरडे

April 27, 2026
नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

April 27, 2026
सुरेल ऑर्केस्ट्राने बार्शीकरांनी धरला ठेका

सुरेल ऑर्केस्ट्राने बार्शीकरांनी धरला ठेका

April 27, 2026
धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस सोलापूरात शेनाचा अभिषेक

धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस सोलापूरात शेनाचा अभिषेक

April 27, 2026
खेडभाळवणी येथे ‘एकता महिला मंच’चा भव्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

खेडभाळवणी येथे ‘एकता महिला मंच’चा भव्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

April 27, 2026
कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

April 27, 2026
पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0832647

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697