जेऊर – केम (ता.करमाळा) ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ.अनिता शरद वायभासे तर गटनेतेपदी सागर कुरडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अच्युत काका पाटील, विष्णू दादा पारखे, सागर राजे दौंड, महावीर तळेकर, बाळासाहेब देवकर, संदीप तळेकर, महेश तळेकर सर, दादासाहेब गोडसे, दिलीप नाना दौंड, विलास बीचीतकर, आनंद शिंदे, सागरराज तळेकर, बापू तळेकर, सचिन काळे, सुलतान मुलाणी, योगेश ओहोळ, निखिल तळेकर, राजेंद्र देवकर सोमा यादव राहुल वायभासे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच युवा परिवर्तनचे ग्रामपंचायत सदस्य गोरख काका पारखे, दत्तात्रय बीचीतकर, विजयसिंह ओहोळ, सौ. अन्वरनबी मुलाणी, सौ. अलका गोडसे, सौ. वंदना तळेकर, सौ. ऋतुजा ओहोळ, कमल अवघडे यांच्यासह केम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवीन पदाधिकाऱ्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.






















