अकलूज – अहिल्यादेवी होळकर व महात्मा बसवेश्वरांचे स्मारक एकाच ठिकाणी घेऊन जसे जातीय सलोख्याचे दर्शन घडवले तसेच स्वच्छता व वाहतुकीच्या बाबतीतही स्वयंशिस्त पाळून एक वेगळा आदर्श निर्माण करावा असे आवाहन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले
येथील बसवेश्वर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व जगादज्योती महात्मा बसवेश्वर बाल उद्यानाच्या भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आ. उत्तम जानकर किशोरसिंह माने पाटील उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्ष रेशमा आडगळे, विलास क्षीरसागर यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दोन्ही समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात नागेश नष्टे यांनी थोर प्रशासक अहिल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या तर बाराव्या शतकात संसदीय लोकशाही व महिलांना समान हक्क याविषयी सुटसुटीत प्रणाली तयार करणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर होते त्यामुळे या दोन्ही महान व्यक्तींच्या स्मारकाने अकलूजच्या वैभवात भरच पडणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन
साठे यांनी तर आभार लक्ष्मीकांत वाघे यांनी मानले.



























